ताज्या घडामोडी

हवेत फायरींग करणारा कैलास फड अटक.

फायरिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता प्रचंड व्हायरल.

मस्साजोग येतील सरपंच देशमुख अपरहन करून  हत्या करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.या हत्येतील मास्टर माईंड व आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.यातच परळी येथे रिव्हॉल्वर मधून हवेत फायर करणाऱ्या कैलास फड याचां हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी व्हायरल केला होता.तसेच अंजली दमानिया यांनी देखील या व्हिडिओ बाबद  बीड पोलीस अधीक्षक यांना विचारणा करून कारवाई करण्याची मागणी केली होती.यावर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तात्काळ ॲक्शन घेत हवेत फायरिंग करणाऱ्यावर कारवाई करण्याचे सूचना संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना दिली.  या व्हीडीओ मधील व्यक्ती ही कैलास बाबासाहेब फड, रा. कन्हेरवाडी, ता. परळी, ह.मु. बँक कॉलनी, परळी वै. असल्याची परळी शहर पोलीसांची खात्री झाली. कैलास फडच्या ताब्यात असलेल्या शस्त्राबाबत खात्री करण्यात आली असता कैलास बाबासाहेब फड याच्याकडे जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयाकडील दिनांक २७/०२/२०२३ रोजीचा शस्त्र परवाना असल्याची तसेच त्याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती मिळाली.आरोपी कैलास बाबासाहेब फड याने त्याच्याकडील परवाना प्राप्त असलेल्या रिव्हॉल्वरमधून हवेत फायर केलेल्या घटनेबाबत माहिती घेता सदरची घटना ही सुमारे एक वर्षापुर्वीची असून त्याने त्याच्या घरासमोरील वाहनाची पुजा करतांना व रस्त्यावर हवेत फायरिंग केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. परंतू आरोपी कैलास बाबासाहेब फड याने जिल्हाधिकारी यांचे शत्र परवान्यातील अटी शर्तीचे उल्लंघन करुन रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केलेले असल्याने पो.स्टे. प्रभारी अधिकारी, परळी शहर यांचे आदेशावरुन फिर्यादी विष्णू उद्धवराव फड, पोलीस शिपाई, पोलीस ठाणे परळी शहर यांनी सरकारतर्फे पो.स्टे. परळी शहर येथे फिर्याद दाखल केली. त्यावरुन गुरनं. १९५/२०२४, कलम ५/२७, ३० भारताचा शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयातील आरोपी कैलास बाबासाहेब फड यास आज दिनांक २६/१२/२०२४ रोजी दुपारी अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची ०१ दिवसाची पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. अधिक तपास मा. पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली पो. वाय. बी. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. परळी शहर हे करीत आहेत.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button