ताज्या घडामोडी

वाल्मीक कराडच्या मुलाच्या कमरेला पण पिस्तूल.

सुशील कराड नावाने कोणताही पिस्तूल चा परवाना नाही...अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारीसंबंधी आणखी एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये सुशील वाल्मीक कराड नामक तरुणाच्या कंबरेला पिस्तुल असल्याच दिसत आहे. दमानिया यांनी या तरुणाच्या नावावर कोणताही शस्त्र परवाना नसल्याचा दावा केला आहे. हा तरुण मस्साजोग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मीक कराड यांचा मुलगा असल्याचे समजते.बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आले आहे. यामुळे त्याची संवेदनशीलता वाढली आहे. विशेषतः या हत्याकांडामुळे हादरलेल्या बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी संपवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी सुशील वाल्मीक कराडचा फोटो ट्विट केला आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, अंजली दमानिया यांनी अन्य एका ट्विटद्वारे डिगोळआबा गावचे सरपंच जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे यांचाही एक पिस्तुल असणारा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सोनवणे हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटोत असल्याचेही दिसून येत आहेत. ‘पिस्तूलंच पिस्तुलं… डिगोळआबा गावचा सरपंच याचे नाव जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे असे आहे. मला कळवण्यात आले आहे की ह्यांच्यावर खंडणी, अपहरण असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. SP नवनीत कावत यांनी गुन्हे अहेत की नाही याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा’, असे दमानिया यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दमानिया यांनी सोनवणे यांचा गोळीबार करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button