वाल्मीक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी !
मंजली कराड, बॉडीगार्ड व राजेश्वर चव्हाण यांची चौकशी.

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात अली होती.हे हत्या प्रकरण बीड जिल्ह्यासह राज्यात विधानसभा लोकसभेत गाजले,या हत्या चा तपास सीआयडी कडे देण्यात यावा अशी मागणी देशमुख कुटुंबियानी व ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे याचा तपास सीआयडी कडे देण्यात आला. मस्साजोग येथील पवणचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने शुक्रवारी साडे नऊवाजेपर्यंत चौकशी केली.जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना तर लातूरहून पोलिस वाहनातून बीडला आणण्यात आले होते. त्यांना आता शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे.केज तालुक्यात पवणचक्की उभारणीचे काम करणाऱ्या अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सुनिल केदु शिंदे (वय ४२ रा. नाशिक ह.मु.बीड) यांना दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड (रा. परळी), विष्णु चाटे (रा. कौडगाव ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सध्या केवळ विष्णू चाटे हा एकमेव आरोपी अटक असून त्याला शुक्रवारी न्यायालयाने ११ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत. याच गुन्ह्यातील चाटे आणि घुले यांचा मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातही समावेश आहे.त्यामुळे या खंडणीच्या प्रकरणाकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. याच खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी मंजीली वाल्मीक कराड यांना परळी येथून बोलावून घेतले. वाल्मीक कराड यांचे अंगरक्षक याना देखील चौकशीसाठी बोलवून त्यांची मोबाईल तपासण्यात आले तर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना लातूरहून सीआयडीच्या पथकाने बीडला चौकशीसाठी आणण्यात आले. त्यामुळे सीआयडी तपासाला वेग आल्याचे चित्र दिसत आहे.