ताज्या घडामोडी
मोर्चा सुरू होण्याआधीच बीड शहर जाम !
देशमुख हत्येतील. आरोपी व मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी मोर्चा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बीड जिल्ह्याचे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून या हत्यतील आरोपी व मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असल्याने आज बीडमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्चात सामील झाले असून, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून मोर्चासाठी नागरिक सहभागी झाले आहे त. सुरू होण्याआधीच बीड शहर जाम झाले. काही वेळातच मोर्चाची होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.