
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात अली होती.या घटनेने बीड जिल्हा सह महाराष्ट्र हादरला.19 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने बीडमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने नागरिक सामील झाले होते.हत्येतील आरोपींना अटक करा.व फाशी द्या अशी मागणी मोर्चे कधी करत होते.ही हत्या पवनचक्कीच्या खंडणीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.या हत्येतील व खंडणीतील चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सीआयडीचे अधिकारी करत आहेत. जवळपास 100 जणांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली. खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सह इतर आरोपी फरार असल्याने त्यांच्या शोधकार्यासाठी सीआयडी ची नऊ पथके तयार करण्यात आली असून 150 अधिकारी व कर्मचारी आरोपींच शोध घेत आहेत. यातच रात्री वाल्मीक कराड यांचे बॉडीगार्ड व पत्नीची सीआयडीच्या अधिकाऱ्याने चौकशी केली. आज देखील इतरांना चौकशीसाठी बोलण्यात आले होते. अपहरण केलेल्या वाहनात दोन मोबाईल आढळले असून त्यावरून कोणाला कॉल व्हाट्सअप कॉल व्हिडिओ कॉल केले यासाठी ते मोबाईल तपासणीसाठी पाठवले आहेत.या वाहनावरील ठसे व आरोपींची ठसे हे जुळले असून सीआयडीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. खंडणी व हत्यतील आरोपी सापडत नसल्याने ते बाहेर देशात पळून जाऊ नयेत म्हणून आज वाल्मीक कराडसह आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. तसेच त्यांची संपत्ती देखील सील करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वाल्मीक कराडसह आरोपींची बँक खाते गोठवण्यात आल्याने वाल्मीक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावरून सीआयडीच्या तपासाला वेग आल्याचे दिसत आहे.