
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २० दिवस झाले.हा तपास सीआयडी कडे असून सीआयडीचे नऊ पथक नेमण्यात आले.या पथकात जवळपास दीडशे पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीचा शोध घेत आहेत. वाल्मीक कराड यांच्या १०० च्यावर निकटवर्ती याची चौकशी केली असून आज राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या सह इतरांची चौकशी करण्यासाठी सीआयडीने बोलवले होते. अपहरण करण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओवर ठसे व आरोपीचे ठसे जुळले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मोबाईल वरून एका बड्या नेत्याला फोन केल्याची माहिती आहे. परंतु त्या नेत्याचे नाव उघड करण्यात आले नाही. व त्याच मोबाईल वरून व्हाट्सअप कॉल व्हिडिओ कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खंडणी व हत्या मधील आरोपी हे देशाबाहेर जाऊ नये म्हणून यांची संपत्ती व बँक खाते सिल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यानंतर पत्नी, नातेवाईक व निकटवर्ती याचे बँक खाते देखील गोठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड यांना पोलिसांना शरण आल्याशिवाय पर्याय नसल्याने ते २४ तासाच्या आत पोलिसांना आत्मसमर्पण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.