देशमुख हत्येतील आरोपींना फाशी होत नाही तो पर्यंत कपडे घालणार नाही.
धाराशिव येथील मराठा बांधवाने घेतली शपथ.

मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती.या घटनेनं बीड जिल्ह्याचा महाराष्ट्र हादरला. देशमुख यांचे मारेकरी अद्यापही मोकाट असल्याने महाराष्ट्रात मारेकऱ्यना अटक करून फाशी व्हावी यासाठी मोर्चे निघत आहेत. धाराशिव येथील एका मराठा सेवकाने जो पर्यंत संतोष आण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होणार नाही तोपर्यंत कपडे घालणार नाही अशी शपथ घेतली. बीडमध्ये लाखोच्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सामील झाले होते.हा तरुण धाराशिव येथून बीडमध्ये मोर्चात सामील झाला होता त्याने सर्वांचे लक्ष घेतले होते. देशमुख यांच्या हत्येला वीस दिवस उलटले तरी यातील मुख्य सूत्रधार व आरोपी सापडत नसल्याने पोलिसावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.*मयत ……..तरुणी प्रकरणात*
*संजय राठोडचं नाव आल्या आल्या लगेचच महाविकास आघाडीतील तत्कालीन मुख्यमंत्री साहेब यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता.*
*सध्याच्या बीड प्रकरणात सर्वजण मंत्र्याच्या विरोधात असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत परंतु राजीनामा घेण्याची धमक आजच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही ?*
*_ज्यांना दाऊद पकडुन आणायचा होता त्यांना “वाल्मीक कराड सापडत नाही?”*अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत.