ताज्या घडामोडी

खेळणीतील बंदुकीतून टिकल्या उडवत आंदोलन.

गुन्हेगारांचे शस्त्र परवाने रद्द करा..डॉ.गणेश ढवळे

 

 

 

बीड:- ( दि.३० ) बीड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या गेल्या ११ महिन्यात ४० खुन,खुन करण्याचा प्रयत्न केल्याच्या १७८ तसेच गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्हे तसेच बीड जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित नसुन १६६ अत्याचाराच्या घटना तर विनयभंग, छेडछाडीच्या ४१३ घटना घडल्याची पोलिस दरबारी नोंद आहे.तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त १६ गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळुमाफिया, अपहरण,खुन, खंडणी,मटका बहाद्दर, गोळीबार या सारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि याप्रकरणी गांभीर्य नसलेल्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.३० सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तूलाने टिकल्या उडवत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात रामधन जमाले (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष,माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप, नितिन सोनावणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना,शेख युनुस,सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक,आदी सहभागी होते.तसेच सायं दैनिक अभिमानचे संपादक राजेंद्रकुमार होळकर, दैनिक पाटोदा संचारचे संपादक विलास डोळे, मराठी पत्रकार परीषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 

सविस्तर माहितीस्तव

बीड जिल्ह्यात आठवड्याला एक खुन,दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न अन अत्याचार २०२३ च्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या १,१४७ ने वाढली 

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असुन सामान्यांसह महिला असुरक्षित आहेत.२०२३ च्या तुलनेत यावर्षी १ हजार १४७ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. आठवड्याला एक खुन तर दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न अन अत्याचार होतोय.गेल्यावर्षी २०२३ मध्ये ११ महिन्यात ६२ खुन तर यावर्षी २०२४ मध्ये ४० खुनांची नोंद, २०२३ मध्ये १७८ खुनांचा प्रयत्न तर २०२४ मध्ये १७८ खुनाच्या प्रयत्न घटनांची नोंद आहे.२०२३ मध्ये अत्याचाराचे १५७ गुन्हे दाखल होते तर २०२४ मध्ये १६६ गुन्हे दाखल आहेत.विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत २०२३ मध्ये ४०५ गुन्हे दाखल होते तर २०२४ मध्ये ४१३ एवढे गुन्हे दाखल आहेत. गर्दी आणि मारामारीच्या घटना २०२३ मध्ये ३९१ तर २०२४ मध्ये ११ महिन्यात ४६४ गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button