भाजीपाल्यासारखे पिस्तूल परवाने वाटले..आ.सुरेश धस
पिस्तूल पिस्तूल परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

मस्साजोग सरपंच अपहरण व हत्या झाल्याने बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या हत्येतील मुख्य सूत्रधार व आरोपी अद्यापही मोकाट असल्याने कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळे असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये ११२२ बंदूक परवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर आली असून, बीड जिल्ह्यातील सर्वाधिक परवाना हे परळी तालुक्यात असल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पिस्तूल परवाने का देण्यात आले,?कोणाच्या शिफारशीने देण्यात आले? यावर प्रश्नचिन्ह निर्माण आ.सुरेश धस यांनी केले. तसेच बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी, अवैध वाळू उपसा व वाहतूक तसेच परळी शहरात बिनधास्त राख कोणाच्या आशीर्वादाने वाहतूक होते असा प्रश्न सुरेश धस यांनी केला. आज जिल्हाधिकारी याना भेटून गुन्हे नोंद असणाऱ्या चे परवाने रद्द करावे अशी मागणी केली.तसेच ज्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात हे शस्त्र परवाने देनाराची व शिफारस पत्र देनारची देखील चौकशी करण्यात यावी.हे पिस्तूल परवाने भाजीपाला फुटाणे वाटल्यासारखे देण्यात आले आहेत त्याची तपासणी करून रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारीकडे केली.