धनंजय देशमुख यांनी घेतली सीआयडी अधीक्षकाची भेट.
वाल्मीक कराड यांच्या पत्नीसह दोन महिलाची चौकशी सुरू.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २० उलटले असून यातील आरोपी व मास्टर माईंड अद्यापही फरार असल्याने सीआयडी चे नऊ पथक व १५० अधिकारी व कर्मचारी कडून आरोपींचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सीआयडीने कालच फरार आरोपीची प्रॉपर्टी जप्त करून बँक खाते सील करण्यात आले. त्यामुळे वाल्मीक कराड सह फरार आरोपीचां फास आवळला असल्याचे दिसत आहे. सीआयडी अधिकाऱ्याने वाल्मीक कराडच्या जवळच्या १०० व्यक्तीची आत्तापर्यंत चौकशी केली आहे.आज धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधीक्षक यांची स्वतःभेट घेऊन तपासा बाबद माहिती घेतली. उद्या पर्यंत सी डी आर मिळणार असल्याची माहिती मयत सरपंच देशमुख यांच्या भावाने दिली. तसेच न्यायालयात याचिका देखील दाखल केल्याने यावर ते उद्या सविस्तर बोलणार असल्याचे सांगत. खंडणीचां गुन्हा दाखल असलेले वाल्मीक कराड यांची पत्नी ज्योती जाधव यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली. तसेच धाराशिव (कळंब) येथून देखील दोन महिलांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती मिळत आहे.