ताज्या घडामोडी
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पिस्तूल परवाना व अवैध धंद्याबाबत काय म्हणाले पहा !
गरज नसल्यास शस्त्र परवाना रद्द होणार.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करून हत्या करण्यात आली होती.त्या अनुषंगाने बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला. आज आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन शस्त्र परवाना बाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. आज सायंकाळी सात वाजता नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी माहिती सांगताना परवानाधारक शस्त्र असणारांनी पिस्तूल सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असेल किंवा शस्त्र परवाना गरज नसेल तर अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करणार असल्याची माहिती दिली.तसेच सोशल मीडियावर सामाजिक भावना दुखावल्याच्या पोस्ट करणारा वर देखील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.