ताज्या घडामोडी

तरुणावर प्राणघातक हल्ला,शरीरावर १७ टाके.

नूतन पोलीस पोलीस अधीक्षक आल्यावरही नेकनूर पोलिसांची डेरींग हल्ला करणारास सोडून दिले.

 

नेकनुर येतील जि.प. शाळेच्या ग्राऊंडवर बोलावुन घेत एका इसमाने कळसंबर येथील बसचालक असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. जवळच असलेल्या मोटार सायकलवर कोल्ड्रीग्सची बॉटल फोडून त्याच बॉटलने तरूणाच्या पाठीवर, पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी होवून  १७ टाके पडले आहेत. दरम्यान, ग्राऊंडवर खेळणाऱ्या मुलांनी हल्ला करणाऱ्या इसमास पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. मात्र नेकनुर पोलीसांनी तास दोन तास बसवुन घेत नंतर त्याला चक्क सोडून दिले.विशेष म्हणजे या प्रकरणात नेकनुर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. जखमीचा जबाब घेवुन नंतर गुन्हा दाखल करू, असे सांगत नेकनुर पोलिसांनी वेळ मारून नेली. विशेष म्हणजे नवीन एसपी साहेब आल्यानंतरही गुंडगिरी दहशत कमी होताना दिसून येत नाही. नेकनुर पोलिसांनी केलेली डेअरींग खरोखरचं कौतुकास्पद आहे. आमच्यावर कितीही मोठा अधिकारी आला आणि त्यांनी कितीही खाक्यात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र आमच्या मनाप्रमाणेच वागणारह हेच नेकनुर पोलिसांनी दाखवुन दिले.

बीड तालुक्यातील कळसंबर येथील सतिश मोहन धन्वे (वय ३७) हे सोमवारी एका सलुनमध्ये बसलेले असतांना नेकनुर येथीलच एका इसमाने धन्वे याला जिल्हा परीषद शाळेच्या ग्राऊंडवर बोलावुन घेतले. तो येताच जवळची कोल्ड्रींग्सची बॉटल फोडून त्याच बॉटलने सतिश धन्वे याच्या पाठीवर, पोटावर वार केले. ते पाहून ग्राऊंडवर खेळणाऱ्या मुलांनी हल्ला करणाऱ्या इसमाला पकडले आणि बॅटने मारले. त्यानंतर त्याला पोलीसांच्यास्वाधीन केले. नेकनुर पोलीसांनी मारहाण करणाऱ्या इसमाला ठाण्यात बसवुन घेतले. नंतर मात्र तो मनोरूग्ण आहे, त्याला कोणी सांभाळत बसायचे ? असे म्हणत तास दोन तासात सोडूनही दिले. वास्तविक पाहता पोलीसांनी मारहाण करणाऱ्या इसमाला ताब्यात घेणे आवश्यक होते. मात्र आधी जखमीचा जबाब घेऊ आणि त्यानंतर काय दाखल करायचेते बघू, असे म्हणत त्याला पाठवुन दिले. या मारहाणीत सतीश धन्वे याच्या पाठीला व पोटाला गंभीर दुखापत झाली असुन १७ टाके पडले आहेत. त्याच्यावर बीड जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्र. ५ मध्ये उपचार सुरू आहेत. एवढे गंभीर प्रकरण असतांना नेकनुर पोलीसांनी मारहाण करणाऱ्या इसमाला सोडून दिले. एकतर तिथल्या पोलीसांकडून काही झालं नसतं, इकडून- तिकडून ग्राऊंडवर खेळणाऱ्या पोरांनी मारहाण करणाऱ्या इसमाला पकडून त्यांच्या स्वाधीन केले तर ते ही नेकनुर पोलीसांना हाताळता आले नाही. यावरून नेकनुरचे पोलीस किती सतर्क आहे ? आणि त्यांना अशा घटनांचे किती गांभिर्य आहे ? हे दिसुन येते. एकीकडे जिल्ह्यात देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत स्वतः पोलीस अधिक्षक नविन काँवत दररोज वेगवेगळ्या कारवाया करत आहेत. त्यांनी ठाणेप्रमुखांनाही वेळोवेळी गुन्ह्याच्या अनुषंगानेसुचना केलेल्या आहेत. तरीही नेकनुर पोलीस आरोपीला सोडण्याचे धाडस करतात, यातुनच नेकनुर पोलीसांची आणि तिथल्या ठाणे प्रमुखांची कर्तबगारी दिसुन येते.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button