वाल्मीक कराड आज पोलिसांना शरण येणार ?
वाल्मीक कराड खंडणीतील फरार आरोपी,सीआयडी पथक पुण्यात ठोकून.

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याने हा वाद खंडणीचा असल्याचे सीआयडी अधिकाऱ्याना तपासात समोर आले आहे. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी प्रकरणी दाखल करण्यात आला. तेव्हापासून वाल्मीक कराड हे फरार होते. सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांचे जवळपास 100 बँक खाते होल्ड केले होते. तसेच या गुन्ह्यातील फरार आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहे. सीआयडी अधिकाऱ्यानी वाल्मीक कराडच्या १०० च्या वर निकटवर्ती चौकशी केली आहे. या हत्या मागील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हे फरार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले देशमुख यांना न्याय मिळावा व या हत्येतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी बीड मध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता. मग त्या मोर्चात लाखोच्या संख्येने नागरिक सामील झाले होते. आता महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारवर वाढता दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे खंडणी गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण येणार आहेत.बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच तालुक्यातील खंडणी प्रकरणावरून सध्या राज्यात गदारोळ मजला आहे. खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता, तसेच राजकीय व्यक्तींकडून देखील ही मागणी लावून धरण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज दुपारी पुणे येथील सीआयडीसमोर वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती आहे. वाल्मीकराला ताब्यात घेण्यासाठी सीआयडीचे एक पथक पुणे येथे तळ ठोकून आहे.त्यानंतर त्यांना बीडला आणण्यात येईल आणि मग पुढील कारवाई होईल.