ताज्या घडामोडी

अखेर वाल्मीक कराड सीआयडी ला शरण !

वाल्मीक कराडवर होते खंडणीचे आरोप.

बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मागील काही दिवसांपासून सीआयडीची 13 वेगवेगळी पथके त्याच्या मागावर होती.बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु 22 दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले यांच्यासह तिघेजण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट होता. त्याच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत होते. मात्र, कराड सापडला नाही. अखेर मंगळवारी सकाळी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button