
केज पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावरून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयासमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.
कराड यांनी म्हटले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मात्र, राजकीय व्देषातून माझे नाव या प्रकरणात जोडले गेले आहे. जर तपासात मी दोषी ठरलो, तर शिक्षा भोगण्यास तयार आहे.”
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कराड यांच्या या घोषणेमुळे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलीस आणि सीआयडी विभाग या संदर्भात पुढील पावले उचलत आहेत.
सध्या कराड यांच्या आत्मसमर्पणाची प्रक्रिया कधी आणि कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.