वाल्मीक कराडला सीआयडी आजच केज न्यायालया समोर हजर करणार.
वाल्मीक कराडमुळे केज न्यायालय राहणार रात्री उशिरापर्यंत सुरू

केज चर्चित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांनी अखेर सीआयडीकडे आज दुपारी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणानंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले असून, ते पुण्याहून बीड जिल्ह्यातील केजकडे रवाना झाले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. खंडणी प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून, पोलिसांनी अनेक दिवसांपासून त्यांचा शोध सुरू ठेवला होता.सीआयडीकडून त्यांच्या चौकशीला सुरुवात होणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सीआयडी पथक वाल्मीक कराडला पुण्यातून ताब्यात घेऊन केज येथील न्यायालया समोर हजर करणार असून. रात्री उशिरापर्यंत केज न्यायालय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.