ताज्या घडामोडी
वाल्मीक कराड यांना १४ दिवसाची CID कोठडी

खंडणी प्रकरण: वाल्मीक कराड यांना 14 दिवसांची CID कोठडी, सरपंच संतोष देशमुख हत्येत सहभागाचा आरोप
केज न्यायालयाने खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड यांना 14 दिवसांची CID कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कराड यांचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा दावा CID ने केला आहे.
सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी न्यायालयात दिलेल्या युक्तिवादात कराड यांच्या विरोधात गंभीर पुरावे असल्याचे सादर केले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, कराड यांचा हत्येच्या कटात महत्त्वाचा सहभाग होता, तसेच खंडणी व हत्येतील संबंध स्पष्ट करण्यासाठी तपास आवश्यक आहे.
CID च्या वतीने आरोपीची कोठडी वाढवून आणखी माहिती मिळवण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने CID च्या मागणीला मान्यता देत कराड यांना 14 दिवसांची CID कोठडी सुनावली.