वाल्मीक कराड ताब्यात असलेल्या शहर पोलिस ठाण्यात येणारांची कसून चौकशी.
वाल्मीक करडची सीआयडी कडून चौकशी,शहर ठाण्यात तगडा पोलीस बंदोबस्त.

केज. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्या मागील कारण खंडणीची असल्याचे उघड झाल्याने वाल्मीक कराड सह इतरावर अवादा पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मीक कराड सह इतर आरोपी 20 दिवस फरार होते. परंतु वाल्मीक कराड पुणे येथे सीआयडीला शरण आला होता. त्याला केज न्यायालया समोर रात्री उशिरा हजर करण्यात आले यावेळी दोन्ही पुढील वकिलांचा युक्तिवाद होऊन 14 दिवसाची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. केज न्यायालय व रुग्णालय परिसरात वाल्मीक कराड च्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. वाल्मीक कराड हे सध्या चौकशीसाठी बीड शहर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आल्यामुळे याठिकाणी पोलिसांकडून विशेष खबरदारी बाळगली जात आहे. यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि येण्याचे कारण नोंदवून घेतले जात आहे.तसेच कुणाकडे काम आहे? कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे? त्याची नोंद रजिस्टर वर घेतली जात आहे. हा डेटा दररोज सीआयडी आणि पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात येणार आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीतून सीआयडीच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.