महामार्ग पोलिसांकडून ट्रक चालकास बेदम मारहाण.
पाडळशिंगी टोलनाक्या जवळ मारहाण,पाय फ्रॅक्चर, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

बीड प्रतिनिधी बीड पोलीस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत अवैध धंद्यावर कारवयास वेग आला आहे. परंतु काही पोलीस अधिकारी, कर्मचारी हे अवैध धंदेवाल्यांना पाठबळ मिळत असल्याचे देखील समोर येत आहे. आज सकाळी हैदराबाद वरून गुजरातकडे एक ट्रक जात असताना पाडळशिंगी टोलनाक्यावर ट्रक थांबवत विविध त्रुटी काढत महामार्ग पोलिसांनी पैशाची मागणी केली. ट्रक चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तीन ते चार महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ट्रक चालकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत ड्रायव्हरचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाडळशिंगी टोलनाक्यावर ट्रक चालकाला पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवून पैसे मागितले. मात्र, ड्रायव्हरने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्याला शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.या घटनेमुळे पोलीस यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस जनतेच्या हितासाठी काम करतात की स्वार्थासाठी, असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखण्याचा प्रयत्न होत असताना अशा घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.विशेषतः परप्रांतीय ट्रक चालकाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्याबद्दल नकारात्मक संदेश जाईल, याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. मात्र स्वतःच्या स्वार्थापुढे त्यांना काहीच दिसत नाही असंच म्हणावं लागेल. त्या ट्रक चालकाला एवढी बेदम मारहाण केली की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.