सरपंच देशमुख हत्येतील आरोपींना वॉन्टेड घोषित.
हत्येतील आरोपी दिसल्यास पोलिसांची संपर्क करावा.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या आपण व निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील तीन आरोपी पोलिसाच्या ताब्यात असून मात्र मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे २३ दिवसानंतर ही फरारच आहे. हे प्रकरण सीआयडी कडे असून नऊ पथके व जवळपास दीडशे अधिकारी,कर्मचारी या आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पवनचक्की खंडणीतील गुन्हा दाखल झालेले वाल्मीक कराड हे पुणे सीआयडी पोलिसांना स्वतःहून शरण आले. त्यांना केज येथील न्यायालयासमोर हजर केले असता वाल्मीक कराडला न्यायाधीशांनी १४ दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली.या हत्येतील वरील तीन आरोपी मिळून आल्याने त्यांना फरार (WANTED) घोषित केले.
१)सुदर्शन चंद्रभान घुले, वय 26, व्यवसाय-शेती व मुकादम, रा. टाकळी ता. केज
२)कृष्णा शामराव आंधळे, वय 30, व्यवसाय-शेती व मुकादम, रा. मैदवाडी, ता.धारुर
३)सुधिर ज्ञानोबा सांगळे, वय 23, व्यवसाय- शेती, रा. टाकळी, ता. ता. केज
या आरोपी विरोधात पो.स्टे. केज (जि.बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2), 140(1), 126, 118(1), 34(4), 324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता मध्ये वरील छायात्रिमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आरोपी निष्पन्न असून ते खुना सारखा गंभीर गुन्हा केल्या पासुन फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालु आहे. नागरिकांना अवाहन करण्यात येते की, वरील आरोपीतांचे ठाव ठिकाण्याची कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसुन आल्यास त्यांनी खालील नमुद नंबरवर संपर्क साधुन आरोपीची माहिती कळवावी, माहिती देणाराचे नाव अत्यंत गोपनिय ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षिस देण्यात येईल.असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी संपर्क –
नवनीत काँवत (IPS) पोलीस अधीक्षक, बीड
श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड
चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई
कमलेश मिना (IPS), सहा. पोलीस अधीक्षक, केज
स्थानिक गुन्हे शाखा बीड उस्मान शेख, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा बीड-
मो.नं. 9560409479
मो.नं. 8275046070
मो.नं. 9004428152
मो.नं. 9013661808
मो.नं. 8888667888