घर,पत्र्याचे शेड पाडल्याने केली महिलेने आत्महत्या,बीड शहरातील घटना.
पेठ बीड पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल न केल्याचा आरोप.

बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरातील माऊली नगर भागातील रहिवासी केसर रुस्तुम पवार कुटुंबाला मारहाण करत यांचे राहते घर पाडल्याने आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात प्रेत ताब्यात घेण्यास नकार देत पेठ बीड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यानी 31 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून न घेतल्यानेच आईने आत्महत्या केल्याचे आरोप केला.नाळवंडी नाका परिसरातील पवार कुटुंबीय व त्यांचेच नातेवाईक पवार त्यांच्यात गेल्या काही महिन्यापासून वाद होते. त्यामध्ये दोघांनीही पेठ बीड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले होते.31 डिसेंबर रोजी मागील भांडणाची करापत काढत नागेश पवार व कुटुंबीयांना मारहाण केली. त्यामुळे नागेश पवार हे पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल करून न घेता नागेश पवार यांना दमदाटी केल्याचे सांगण्यात आले. काल दिनाक 2 जानेवारी रोजी मारहाण करत जेसीबी लावून पत्र्याचे शेड पाडल्याने केसर रुस्तुम पवार यांनी राहत्या घरी गळफास घेतला.आज सकाळी शासकीय रुग्णालयामध्ये संबधितावर गुन्हा दाखल करावा यासाठी शवविच्छेदनगृह बाहेरच नातेवाईकांनी आक्रोश केला यावेळी पेठ बीड पोलिसावर गंभीर आरोप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नेहा साबळे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने नागेश पवार व नातेवाईक पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.