ताज्या घडामोडी

अजित पवार बीडचे पालकमंत्री ?

जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बहीण/भाऊ पालकमंत्री नको.. जिल्ह्यातील नेत्यांची मागणी.

 

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे, बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे.या हत्येचा तपास होई पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवावे अशी देखील मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतून बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंर्त्यां मध्ये एकमत झाले असल्याचे समजते. जिल्ह्यात घडणा-या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दोन आठवडे उलटल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी महायुतीत तीन पक्ष असल्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यायचे, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा होवून अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेण्याची शक्यता आहे.

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button