देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या घटनेला २५ दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार होता. सीआयडी चे नऊ पथक व दिडशे कर्मचारी,अधिकारी यांच्या मागावर होते. बीड पोलिसांनी या तिघांना फरार घोषित करून यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर यांचे फोटो सार्वजनिक ठिकाणीं बसवर का लावण्यात आले होते.या हत्या प्रकरणातील फरार आरोपीं पैकी दोघे बीड् पोलिस यांच्या हाती लागले आहेत. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही बीड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य भरातून सर्व आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.या हत्येतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मी स्थानिक गुन्हे शाखा, सीआयडी चे पथक महाराष्ट्रभर आरोपीला शोध घेत होते. यातील चार आरोपी अटक झाले होते, तर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले सह तिघे आतापर्यंत फरार होते. काल रात्री उशिरा बीड् पोलिसांनी यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्याजवळ ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.यातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध बीड पोलीस सीआयडी घेत आहे.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा बीड त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.