देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी विषयी धस काय म्हणाले पहा.
दोन आरोपी आज स्थानिक शाखेने केले जेरबंद

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांना आज के न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पुढील चौकशी सीआयडीचे अधिकारी करणार आहेत. या हत्या प्रकरणातील विशेष वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती.आज आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विशेष वकील बाळासाहेब कोल्हे यांची भेट घेतली व सर्वच आरोपी पुणे येथे कसे सापडतात यावर उत्तर देताना धस म्हणाले “पुणे तेथे काय उणे”व या आरोपींना 100% राजकीय बळ मिळत असल्यानचे देखील आरोप केला असून बीड पोलीस व सीआयडीच्या तपासावर आपण समाधानी असल्याचे आ.धस यांनी सांगितले.या हत्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे निघनार असून आज परभणी येथे मोर्चास उपस्थित राहणार असल्याचे धस त्यांनी सांगितले.