देशमुख हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे लवकरच जेरबंद होणार ?
कृष्णा आंधळे देशमुख हत्येतील फरार आरोपी.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या आली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रत खळबळ उडाली असून या हत्येतील दोन फरार आरोपींना पुणे येथून बीड स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले.देशमुख हत्येतील आरोपी जयराम चाटे,प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटे, वाल्मीक कराड याला या आधीच सीआयडीच्या ताब्यात होते. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला बीड स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. परंतु यातील शेवटचा आरोपी कृष्णा आंधळे हा अध्यापही फरार आहे. बीड पोलिसांनी सुदर्शन घुले,सुधीर सांगळे व कृष्ण आंधळे याला फरार घोषित करून त्यांचे बँक खाते सील करण्यात आले होते, त्यांची संपत्ती देखील जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. फरार आरोपींचे सार्वजनिक ठिकाणी,बसवर फोटो लावण्यात आले होते, त्याची माहिती देणाऱ्याला बीड पोलिसांकडून बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. या हत्येतील सर्व आरोपी सीआयडीच्या ताब्यात असून शेवटचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. परंतु तो देखील आरोपी पोलिसाला शरण येण्याची शक्यता आहे.