ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी पोलिसांनी केले,चालकास”मॅनेज”
ट्रक चालकास मॅनेज करणारे पोलीस व व्यक्ती कोण?

बीड प्रतिनिधी:बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोल नाक्यावर ट्रक चालकासोबत झालेल्या मारहाणीचे प्रकरण गाजत होते. चार ते पाच महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाला मारहाण केली, ज्यामुळे त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्रक चालकाने पोलिसांवर आरोप करताना, “हजार रुपये न दिल्यामुळे मला मारहाण करण्यात आली,” असे म्हटले होत. यासंदर्भातचा व्हिडिओ ही समोर आला होता.या घटनेमुळे टोल नाक्यावर कार्यरत काही कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात आली अशी माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या भीतीने त्यांनी खाजगी लोकांच्या माध्यमातून चालकाला ‘मॅनेज’ केल्याची माहिती मिळत आहे.या प्रकरणात लाखात दिल झाल्याची चर्चा आहे.त्या ट्रक चालकाचा पाय मारहाणीत फॅक्चर झाला असून त्यावर शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते परंतु रात्री उशिरा त्या चालकाला जिल्हा रुग्णालयातून हलवून टवेरा ॲम्बुलन्सद्वारे त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आले.दरम्यान, गेवराई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (पीआय) रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात चालकाचा जवाब नोंदवण्यासाठी आले होते. मात्र, खाजगी लोकांच्या हस्तक्षेपामुळे नेमका काय जवाब नोंदवला गेला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ही घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत असून, ट्रक चालकाला दिलासा मिळावा आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. त्या ट्रक चालकास मॅनेज करणारे कोण? गावी पाठवणारे कोण? ते तपासून मॅनेज करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.