सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणारा पोलिसाच्या ताब्यात.
संतोष देशमुख हत्याचे उलगडा होणार.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरविणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली.तर पुरवणी जबाब आवरून विष्णू चाटे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. सध्या या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे