देशमुख कुटुंबियांना त्रास दिला तर धनंजय मुंडेना रस्त्यावर,राज्यात फिरू देणार नाही…जरांगे पाटील
देशमुख हत्येतील सर्वच आरोपींना फाशी द्या.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्येने बीड जिल्हयासह महाराष्ट्र हादरला होता. या हत्येतील आरोपी सीआयडीच्या ताब्यात असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा व यातील सर्वच आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी देशमुख कुटुंबीय, मस्साजोग ग्रामस्थ व महराष्ट्रातील नागरिक करत आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा परभणी येथे आज परभणी येथे मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात नागरिकांचां लक्षणीय सहभाग होता. दोन दिवसांपूर्वी धनंजय देशमुख हे शहर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तिथे धमकवण्यात आल्याने धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली होती. देशमुख कुटुंब यांना त्रास झाला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.तसेच या आरोपीची नार्को टेस्ट करावी,खंडातील आरोपीचाच खुनात सहभाग असल्याचे देखील सांगितले.या हत्येत सर्वच आरोपी पुण्यात कसे सापडतात?असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यानंतर जर आपल्या समाजावर महिलावर अन्याय झाला तर जशास तसे उत्तर द्यायचे.या हत्या प्रकरणात जर धनंजय मुंडे यांचा काही सहभाग असेल काही क्लू सापडला तर त्यांना सोडणार नाही,रस्त्यावर व राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.