ताज्या घडामोडी
देशमुख हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले,सुधीर सांगळेला १५ दिवसाची पोलीस कोठडी..
केज न्यायालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.ही हत्या पवनचक्की खंडणीच्या वादातून झाल्याचे कारण समोर आले आहे.यातील पाच आरोपी सीआयडी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.आज सकाळी या हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याला पुण्यातून बीड स्थानिक गुन्हे पोलिसांनी ताब्यात घेतल.त्या दोघांना केज पोलीस ठाण्यात आणून त्यांना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले.या दोन्ही आरोपींना १५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.यावेळी पोलिसांकडून केज पोलीस ठाणे व न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. या दोघांना बीड येथे शहर पोलीस ठाण्यात सीआयडीच्या पोलीस कोठडीत आणले जाणार आहे.