ताज्या घडामोडी
अंजली दमानिया,जरांगे पाटीलवर गुन्हा दाखल करण्यासाठी समाज बांधव आक्रमक.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नागरिकांनी केला ठिय्या.

बीड जिल्ह्यात जातिवाद काही कमी होताना दिसत नाही.मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातून मोर्चा सुरुवात झाली. काल परभणी येथे सर्वपक्षीय सर्व धर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी काही वक्तव्य केल्याने समाज बांधव आक्रमक झाला.तसेच अंजली दमानिया यांनी देखील बीड पोलीस दलामध्ये वंजारी समाजाचे कर्मचारी अधिकारी जास्त असल्याचे एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. त्यामुळे त्यात आणखीनच भर पडून आज दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अंजली दमानिया व मनोज जरांगे पाटील यांच्यावर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समाज बांधव मोठ्या संख्येने जमा होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.