
– बीड तालुक्यातील ससेवाडी येथील रामभाऊ सावंत हे शेतकरी दुध विक्री करून मोटारसायकलवरून गावाकडे परत जात असतांना भरधाव टँकरने शेतकर्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाटोदा-मांजरसुंबा रोडवरील ससेवाडी फाट्याजवळ घडली. या दुर्दैवी घटनेत शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यानंतर उपस्थित संतप्त शेतकर्यांनी टँकरच्या काचा फोडल्या. त्यानंतर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
बीड तालुक्यातील ससेवाडी येथील रामभाऊ भानुदास सावंत (वय48) हे आज सकाळी मोटारसायकल क्रमांक एम.एच.23, एम.6066 वरून दुध विक्री करून गावाकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणारा टँकर क्रं.एम.एच.14, एल.बी.8744 ने सावंत यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकल समोरच्या टायरखाली येवून रामभाऊ सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथील शेतकर्यांनी टँकरवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या. त्याचवेळी टँकर चालकाला ताब्यात घेवून नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.