ताज्या घडामोडी

खासदाराला धमकी देणारे API गणेश मुंडेंची तडकाफडकी बदली.

पोलीस प्रेस ग्रूपवर वादग्रस्त विधान भोवले.

 

बीड – वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप ‘वर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामुळे पोलीस दलात वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’ अशी पोस्ट मुंडे यांनी केल्याने त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, आणि मुंडे सारखे पोलीस अधिकारी कोणत्या खासदाराला धमकीची भाषा वापरत आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे.एका पोलीस अधिकाऱ्याने असे वक्तव्य,पोस्ट करणे कितपत योग्य आहे?अशी चर्चा होत असून खाकी मध्ये देखील जातिवाद होत असले तरी यावर दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला.या हत्येचा तपास आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु झालेला आहे. या हत्येच्या पाठीशी जे राजकीय लोक आहेत, त्यांच्याबद्दल जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके यांच्यासहीत सर्वांनीच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील स.पो.नि.गणेश मुंडे आणि स.पो.नि. दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती त्यामुळे API गणेश मुंडे यांची महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून पुणे येथे नियंत्रण कक्षात तडका फडकी बदली करण्यात आली.

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button