मनोज जरांगे विरोधात परळीत गुन्हा दाखल.
परभणीत मोर्चात बदनामीकारक वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्येने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला.हत्येतील आरोपींना फाशी देण्यात यावी व परभणी शहरात सुर्यवंशी व संतोष देशमुख यांचे हत्येसंदर्भाने निषेद मोर्चा आयोजन केलेले होते त्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी बोलतांना ह्या “मुंड्या फुड्याच नाव सुध्दाघेतले नाही हारामखोर आवलादीचे”असे व इतर बदनामी कारक असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मंत्री धनंजय मुंडे बद्दल बदनामीकारक व असवेधानिक वक्तवे केल्याने समाज बांधव आक्रमक होवून परळी पोलीस ठाण्यात म्हणून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे मागणी केली होती.
मनोज जरांगे विरोधात तुकाराम बाबुराव जाधव यांनी दाखल झालेल्या एफ आय आर नुसार भारतीय न्याय संहिता 2023 अन्वय धारा 356 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे तक्रार मध्ये नमूद करण्यात आला.मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, अशा आरोपांखाली परळी शहरात मनोज जरांगें विरोधात तुकाराम आघाव यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावेळी पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.