ताज्या घडामोडी

संविधान बचाओ जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिकांचा सहभाग.

मयत सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल करावा.

     बीड येथील सर्व दलित बहुजन समाजातील संघटना एकत्र येऊन दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी बीड येथे संविधान बचाव जन आक्रोश मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चास सूरुवात करण्यात आली.

परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्याने परभणी शहर बंदचे आवाहन भीमसैनिक आकडून करण्यात आले होते. त्यात सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांचे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, परभणी येथे महिलावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, बीड येथील मसाजोग येथे सरपंच यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात शासकीय नोकरीतील गुत्तेदारी पद्धत रद्द करण्यात येऊन रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरित भराव्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दरमहा देण्यात यावी, शासकीय सेवेतील आरक्षणामधील वर्गीकरण कायदा रद्द करण्यात येऊन शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा धडकला बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा माळवेस,सुभाष रोड,सत्यशोधक अण्णाभाऊ साठे पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारवर रोष व्यक्त करत सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अश्या घोषणा देण्यात आल्या. दलित बहुजन आंबेडकरवादी संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बीड शहरातील गाव खेड्यातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button