आरोपीच्या अटकेसाठी बिंदुसरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन.
पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप.

आईच्या हत्याराना तात्काळ अटक व्हावी व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरिता बिंदुसरा नदी पात्रात पवार सहकुटुंब जलसमाधी आंदोलन आज करण्यात आले. पवार कुटुंबीय राहत असलेल्या मालकी हक्काच्या घरावर नातेवाईक पवार यांनी ताबा करण्यासाठी दहा ते बारा गुंड जेसीबी , ट्रॅक्टर ने घर पडून पवार कुटुंबीय जबर मारहाण केली. या आधी देखील संबंधित आरोपींच्या विरोधात ३०७ गुन्हा नोंद झाला त्यानंतर ३०७ च्या गुन्ह्यांमध्ये दोन नंबरचा आरोपी असलेला गुंड ह्याने पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या विरोधात ३०७ चा खोटा गुन्हा नोंद केला तो दोन नंबरचा आरोपी असताना देखील त्यावेळेस पोलिसांनी त्याला अटक केली नाही. आणि तो पोलीस स्टेशन वरून परत फरार झाला पोलीस प्रशासनाने त्यांना पाठीशी घालण्याचे काम ३०७ च्या गुन्ह्यात केलं त्यानंतर त्या फरार आरोपींनी परत माझा हॉटेल ट्रॅक्टरने पाडले सतीश, नागेश पवार फिर्याद द्यायला गेले असता पोलिसांनी फिर्याद नोंदवली नाही. एक ते दीड वर्षापासून वारंवार पवार कुटुंबावर हल्ले करत राहिले पोलिसात गेलो तरी देखील पोलीस तक्रार घेत नसल्याने त्यांची गुंडगिरी वाढत गेली.दनांक २/१/२०२५ रोजी मालकीच्या प्लॉटवरचे पत्र्याचे शेड जेसीबी लावून आरोपींनी पाडले परिवारांमधल्या व्यक्तींना शस्त्र दाखवून धमकाय लागले माझ्या आईला त्यांनी धमकी दिली तुझ्या मुलाला तर आम्ही एक दोन दिवसात मारून टाकणार आहोत त्यांनी धमकी दिल्यामुळे माझा परिवार भाय भीत झाला होता माझ्या भावाला त्याच्या मुलीच्या सासरी आम्ही लपवून ठेवले आणि दिनांक ३/१/२०२५ रोजी सकाळी ४ ते ५ च्या दरम्यान माझी आई बदामाच्या झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत माझ्या वहिनीने पाहिले व मोठ्याने ओरडू लागल्या म्हणून आम्ही सर्वजण जागे झालो माझ्या आईने फाशी घेतली की माझ्या आईला मारून लटकवलं कारण फाशी घेतली असती तर जीभ बाहेर आलेली असती व माझ्या आईचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले होते ह्यामध्ये माझं २ तारखेला जेसीबी लावून पत्र्याचे शेड पाडणारे व माझ्या आईला मारहान करणारे व माझ्या परिवाराला धमकी देणारे ह्या आरोपींनीच आईचा घातपात केला असावा हे सर्व आरोपी संघटित गुन्हेगार आहेत यांच्यावरती चोरी दरोड्याचे व ३०७ सारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत पोलीस प्रशासनाने यांचा पूर्ण रेकॉर्ड काढून यांच्या वरती मोक्का किंवा एम पी डी अंतर्गत यांच्यावरती कारवाई करावी व ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आमच्या परिवाराला न्याय द्यावा व आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी आज बिंदुसरा नदी पात्रात पवार कुटुंबीयांनी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी न्याय द्या न्याय आमच्या आईला न्याय द्या अश्या घोषणा देण्यात आल्या.