देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसाच्या भेटीला.
हत्या तपासात पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची तक्रार.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे राज्यात चांगलेच वातावरण ढवळून निघाले होते. तसेच बीड जिल्ह्यातील वाढते गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी केली होती.त्यावर देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले आहे.देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सुमोर 25 दिवसानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, यातील एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.या हत्याकांडात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांच्या पत्नी हे संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत कशा पद्धतीने तपास झालेला आहे, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना देतील, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील अधिवेशनात देखील संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात कसा तपास सुरू आहे, याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तपासामध्ये कुठल्या गोष्टी समोर येत आहेत,तपासामध्ये कुठल्या गोष्टी समोर येत आहेत, हे सांगत असतानाच या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. तसेच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडनार नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आज देशमुख कुटुंबीय मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.