ताज्या घडामोडी

हवेत गोळीबार करणाऱ्याचा शस्त्र परवाना रद्द. !

३०३ परवाने रद्द तर काहींची पडताळणी होवून शस्त्र परवाने रद्द होणार.

 

 

* हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह बीडमधील एकूण 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

*शस्त्र परवानाबाबत सरकारची मोठी कारवाई शस्त्र परवानाबाबत सरकारची मोठी कारवाई हवेत गोळीबार करून चमकोगिरी करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांच्यावर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

* बीड जिल्ह्यातील 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द उर्वरित अर्जाची पडताळणी सुरु, आतापर्यंत 303 परवाने केले रद्द

 

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेत आला होता. त्यातच हवेत गोळीबार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. त्याच प्रकरणी हवेत गोळीबार करणाऱ्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले होते.  पण आता शासनाने शस्त्र परवानाविषयी जोरदार कारवाई केली आहे. हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या तब्बल 74 जणांचे शस्त्र परवाना रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत लोकप्रतिनिधींनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बीड जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याची माहिती समोर आले होते, कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने पिस्तुलसह फोटो, व्हिडीओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील 74 जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. आतापर्यंत 303 परवाने रद्द केले आहेत. बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने का देण्यात आले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, लोकप्रतिनिधी व अंजली दमानिया यांनी याविरोधात आवाज उठवल्याने अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button