वाल्मीक कराड ज्या गाडीतून सीआयडीला शरण आला ती स्कॉर्पिओ जप्त.
फरार असताना याच स्कॉर्पिओतून प्रवास केल्याचा पोलिसांचा संशय.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहार करून हत्या करण्यात आल्याने या हत्या मागील कारण पवनचक्की खंडणीच्या वादातून झाल्याचे कारण पोलीस तपासात समोर येत असून. खंडणी प्रकरणी विष्णू चाटे,वाल्मीक कराडवर दोन कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी अवादा कंपनी कर्मचाऱ्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे वाल्मीक कराड गुन्हा दाखल झाल्यापासून २२ दिवस फरार होता.त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड हा पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. वाल्मीक कराड हा स्कॉर्पिओ क्रमांक MH 23 BG 2231 असून ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावे असून वाल्मीक कराड यांनी फरार असताना याच गाडीचा वापर केला होता असे माहिती सीआयडी अधिकाऱ्यने दिली असून अधिक तपासासाठी सीआयडी अधिकाऱ्याने ती स्कॉर्पिओ जप्त करून केज पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे.