बार्शी नाका,सोमेश्वर मंदिर जवळील पुल झाले डम्पिंग ग्राउंड.
सि.ओ.अंधारे यांनी स्वत:फिरून बीड शहराची दुरवस्था पहावी.

बीड दि ७ (प्रतिनिधी) – शहरातील बार्शी रोड वरील सोमेश्वर मंदिरा जवळ असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस कचरा, घान, मांस टाकत असल्याने सोमेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविक भक्त, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून नाक दाबूनच जावे लागत आहे. तर हा कचरा पेटवून दिल्याने रस्त्यावर धुराची लोळचे लोळ पसरल्याने पुलावरून जाणे देखील मुश्किल झाले, या पुलाजवळील कचरा पेटवून दिल्याने पूला जवळून जाताना उग्र वासाने नागरिक हैराण झाले आहेत.त्यामुळे पूलावरून जाताना नाक दाबूनच जावे लागत आहे.बार्शी रोड परिसरातील सर्वच हॉटेल, चिकन, मटण शॉप, मंगल कार्यालये, दवाखाने, बिर्याणी हाऊस, चायनिज हॉटेल यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही दिवसापूर्वी नोटिस दिल्या होत्या दिल्या होत्या परंतु त्या नोटीसला केराची टोपली दाखवली. हॉटेल,चिकन, मटण शॉप, चायनीज हॉटेल, दवाखान्यातील कचरा घान, चिकन, मटण शॉप वाल्यांनी मांस, मंगल कार्यालय चालकांनी उरलेले अन्न किंवा मांस या पुलाजवळ टाकण्यात येते. यावर नगर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची गरजआहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बीड शहरात स्वतः फिरून शहराची झालेली दुरावस्था उघड्या डोळ्यांनी पहावी व पूला जवळ घाण टाकणाऱ्या हॉटेल, दवाखाने, चिकन शॉप, मंगल कार्यालयावर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. तसेच या पुलाजवळ दोन कर्मचारी नेमणूक करून मांस, घाण, दवाखान्या तील साहित्य टाकल्यावर तत्काळ दंड वसूल करण्यात यावा. अशी मागणी या परिसरातील नागरिक व भाविक भक्त करत आहेत.