
बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस वसाहतीतील राहत असलेले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे मु कळंमआंबा ता.केज जि बीड यांनी राहत्या घराच्या बाजूस झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले इंगळे हे बीड पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते.आज सकाळी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी यांची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिले असता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घाटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.