
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील नगर रोड वरील बालेपिर भागातील रहिवासी असलेल्या तरूणाचा अंबाजोगाईतील मुकुंदराज रोडवरील गवळी यांच्या शेतात आज सकाळी मृतदेह आढळून आला. यामुळें एकच खळबळ उडाली असून त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? हे मात्र अजुन समोर आलेले नाही. मृतदेहाच्या तोंडावर जखमा असल्याने घात की अपघात असा प्रश्न पडला आहे.हा मृतदेह शौकत अली मेहराज अली सय्यद (वय २५) या तरूणाचा मृतदेह आज सकाळी अंबाजोगाई येथे गवळी यांच्या शेतामध्ये आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांनी मयत तरूणाच्या कुटुंबियांना कळवली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात आणण्यात आला आहे. तरुणाचा असून पोलीस पुढील तपास करत आहेत.