
बीड: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बीड आगारामार्फत बीड ते सोलापूर मार्गावर ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
सदरील बस मांजरसुंबा, चौसाला,सरमकुंडी फाटा , येरमाळा,धाराशिव व तुळजापूर या स्थानकांवर थांबेल.
सदरील सेवा निवडलेल्या मर्यादित थांब्यांवरच उपलब्ध असणार आहे. प्रवाश्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली ही ई-बस सेवा आरामदायी प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरेल.
पर्यावरण संरक्षण आणि प्रवाशांच्या सोईला प्राधान्य देण्यासाठी अशा प्रकारच्या ई-बस सेवा लवकरच इतर मार्गांवरही सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.