वाल्मीक कराडवर ३०२, मोक्का लावावा म्हणून धनंजय देशमुख चढले पाण्याच्या टाकीवर.
मनोज जरांगे, पोलीस अधीक्षक मस्साजोग मध्ये दाखल.धनंजय देशमुख ची प्रकृती खालावली.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या आपण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या हत्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यातील मास्टर माइंड व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी मस्साजोग गावकरी व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. या हत्या मागील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडला मोक्का अंतर्गत कारवाई करून ३०२ मध्ये आरोपी करावे अशी मागणी केली होती. या हत्यामागील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीय केला आहे.परंतु वाल्मीक कराड वगळता इतर सर्व आरोपींना मोक्का अतर्गत कारवाई करण्यात आली.यामुळे धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत टावर वर चढून उडी मारणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी टावरच्या बाजूला तगडा बंदोबस्त लावला होता. मस्साजोग येथील पाण्याच्या टाकी जवळ मनोज जरांगे पाटील हे देखील दाखल झाले असून पाण्याच्या टाकीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले आहेत. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू झाले असताना अचानक धनंजय देशमुख यांचे प्रकृती खालावली. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांच्या व सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. खंडनी व हत्येतील आरोपी एकच असून वाल्मीक कराडवर मोक्का लावून ३०२ मध्ये आरोपी करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असून मनोज जरागे यांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत पाण्याच्या टाकीवरून खाली यावे अशी विनंती केली.परंतु जो पर्यंत वाल्मीक कराड वर मोक्का ३०२ दाखल होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत मस्साजोग मध्ये दाखल झाले असून धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद करत यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला.