
बीड शहराती लक्ष्मणनगर भागात एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीराम कचरु गजदिवे (वय ३२ वर्ष) रा. लक्ष्मणनगर लेंडी रोड, बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घरगुती कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी (दि.१३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला होता. श्रीराम गजदिवे हा अनेक वर्षापासून मंडप व्यवसाय होता, त्यामुळे त्याची बीड शहरात अत्यंत मेहनती कष्टाळू म्हणून त्याची ओळख होती.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट आहे.