ताज्या घडामोडी

१४ जानेवारी पासून आरटीई प्रवेशासाठी करता येणार अर्ज – मनोज जाधव

जिल्ह्यात आरटीई तून ३५ शाळा घटल्या; २१४ शाळांची नोंदणी

२ हजार २३५ विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश

बीड (प्रतिनिधी) आपल्या पाल्याना देखील उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे अशी इच्छा गोरगरीब ,गरजू पालकांची असते. यासाठीच शासनाच्या वतीने राईट टू एज्युकेशन (आरटीई)अंतर्गत प्रवेश दिले जातात. आरटीई प्रवेश प्रक्रियेचा शाळा नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्रत्येक्षात पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दि १४ जानेवारी पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यातील २१४ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंद केली असून २ हजार २३५ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी पाल्याच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आव्हान आरटीई कार्यकर्ते तथा शिवसंग्रामचे युवा नेते मनोज जाधव यांनी केले आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश देण्याची प्रक्रिया १४ जानेवारी पासून सुरू केली जाणार असल्याचे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालया कडून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाचा अर्ज येत्या १४ ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीद्वारे देण्यात येते. अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली आहे.

 

पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरू शकता

तालुके शाळा प्रवेश
अंबाजोगाई ३४ २८५
आष्टी १० ७५
बीड १७ २३३
धारुर ०७ ९६
गेवराई ३५ ३७०
केज २१ १९०
माजलगांव २९ २४५
परळी २३ २८१
पाटोदा ०३ २५
शिरुर ०८ ६१
बीड शहर २० ३१२
वडवणी ०७ ६२

एकूण २१४ -२२३५

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button