जुगार खेळणाऱ्यांना API दारडेचा दणका .
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत धाबे,हॉटेल व अवैध धंदे मध्यरात्रीपर्यंत सुरू.

बीड (प्रतिनिधी): शहरापासून जवळच असलेल्या समनापुर शिवारात जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. एपिआय वाळराजे दराडे व सोबत पोलीस ह.वा.अतिश मोराळे, गणेश जगताप, आनंद मस्के, कृष्णा जायभाय, सतीश मुंडे पोलीस नाईक नामदेव एकनाथ सानप असे पोलीस ठाणे हद्दीत वेकायदेशीर धंद्यावर कारवाई कामी १७.०० चे वेळ सुमारास पेट्रोलिंग करत असताना गुप्त वातमीदाराने एपीआय दराडे यांना काही इसम तीन पत्ते नावाचा जुगार पैसे लावून खेळत आहे आशी माहिती प्राप्त होताच सदर माहिती पोलीस निरीक्षक वंडेवार यांना देवून दोन पंचना सोवत घेऊन प्राप्त माहितीच्या ठिकाणी वीड ते इमामपूर रोड वरील समनापूर शिवारात छापा टाकला असता १) मोवीन चांद पाशा शेख राहणार मोहम्मदिया मज्जित जवळ इस्लामपुरा वीड २) गायक काली साजिद आली राहणार झमझम कॉलनी वीड ३)सय्यद वाहेद सय्यद मुर्तुजा राहणार शहंशाह नगर वीड) ४) अब्दुल गफूर अब्दुल रशीद राहणार खादरपुरा वार्शी नाका बीड ५) शेख मुख्तार शेख जब्बार राहणार अजमेर नगर बालेपीर बीड हे तीन पत्ते नावाचा तिरट जुगार पैसे लावून खेळत असताना मिळून आल्याने त्यांना दोन पंचा समक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले सदर ठिकाणी एकूण ८,८६,२६० रुपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे तसेच या सर्व जुगार यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे बीड ग्रामीण या ठिकाणी आणून पोलीस हवालदार कृष्णा जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार आतिश मोराळे हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, सह पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्ड पोलीस निरीक्षक बंटीवार साहेब बटेवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस हवालदार अतिश मोराळे, आनंद मस्के, गणेश जगताप, कृष्णा जायभाय, सतीश मुंडे व पोलीस नाईक नामदेव एकनाथ सानप यांनी केली. पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत धाबे, हॉटेल हे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात तसेच ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुटखा,मटका,क्लबवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर अथवा अवैद्य धंद्याबाबत कोणालाही माहिती प्राप्त होताच पोलीस ठाणे बीड ग्रामीण या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांनी केले आहे.