वाल्मीक कराडला मोक्का लागणार ? जेल की बेल ?
केज न्यायालासमोर कराडला हजर करणार,जिल्ह्यात मध्यरात्री पासून जमावबंदी आदेश लागू.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.या हत्येतील कृष्णा आंधळे हा आरोपी अध्यापही पोलिसाला सापडत नसून सीआयडी पथके त्याचा शोध घेत आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला 14 दिवसाची सीआयडी कोठारी सुनावण्यात आली होती, आज वाल्मीक कारडची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला केज येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सकाळी 10:30 वाजता वाल्मीक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यातून केज न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांचा मोठा फौज फाटा तयार करण्यात आला होता. त्यामुळे आज वाल्मीक कराड यांची सीआयडी कोठाडी वाढणार का?या कडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राची लक्ष लागले असून देशमुख हत्येतील सर्वच आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली परंतु वाल्मीक कराडला सह आरोपी करून मोक्का लावण्यात यावा यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी कालच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. ग्रामस्थ आज देखील तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असून वाल्मीक कराडच या हत्या मागील मुख्य सूत्रधार असून याला 302 मध्ये आरोपी करून त्यावर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ लोकप्रतिनिधी लावून धरली आहे.या अनुषंगाने आज बीड जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री पासून 28 जानेवारी पर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. करडला काही वेळातच केज नायायला समोर हजर केले जाणार असून सीआयडी कोठटीत वाढते का?, वाल्मीक कराडला मोक्का लागतो का? केस न्यायालयाच्या आदेशाकडे बीड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.