वाल्मीक कराडवर मोक्काच ! परळी बंद
कराडला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी,देशमुख हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप.

मस्साजोग संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या मधील आरोपीना फाशी देण्यात यावी व देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा यासाठी मोर्चे काढण्यात आले होते. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आवादा पवनचक्की अधिकाऱ्याला वाल्मीक कराड ने विष्णू चाटे च्या मोबाईल वरून दोन कोटी रुपयाची खंडनी मागितल्याची तक्रार देण्यात आली होती.त्यामुळे वाल्मीक कराड हे मागील 14 दिवसापासून सीआयडी कोठडीत होते.आज कोठडी संपल्याने केज न्यायालयात हजर केले असता सीआयडी व सरकारी वकिलाकडून दहा दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर कराडला 14 दिवसाची नायायलियन कोठडी सुनावण्यात आली.आज सकाळपासून परळी शहरात वाल्मीक कराड समर्थका कडून आंदोलन करण्यात आले होते, वाल्मीक कराड ची आई,नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.तर कराड समर्थकांनी टॉवरवर चढून देखील आंदोलन केले होते.वाल्मीक कराड ला अडकवण्यात आल्याचा आरोप आई ने केला होतं.त्यामुळें परळी शहरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. वाल्मीक कराड वर हत्येचा कटात सामील असल्याचा आरोप करत त्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली यामुळे परळी बंदची हाक देण्यात आली. वाल्मीक कराडला मोकका लावण्यात आल्याची बातमी समजतात परळी येथील व्यापाऱ्याने आपापले दुकाने बंद केली. वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली.