वाल्मीक कराड समर्थकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न.
वाल्मीक कराडला मोक्का लावल्याने समर्थक आक्रमक

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.ही हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचा तपासात समोर येत असून यातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.आज वाल्मीक कराड यांची सीआयडी पोलीस कोठडी संपल्याने त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वाल्मीक कराड वर देशमुख हत्येचा कट रचल्याचा आरोप सीआयडी ने केल्याने कराडवर देखील मोक्का लावण्यात आला. यामुळे कराड समर्थक चांगले संतापले असून परळी शहरात सकाळपासूनच पोलीस ठाण्यासमोर वाल्मीक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. काही समर्थकांनी शहरातील टावर वर चढून वाल्मीक कराड वर गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. वाल्मीक कराडला मोका लावल्याची माहिती मिळताच कराड समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल घेऊन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला वेळीच इतर कार्यकर्त्यांनी रोखल्याने अनर्थ टळला. एका महिलेने देखील अंगावर पेट्रोल टाकून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परळी शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली.एका बस वर दगडफेक झाल्याने परळी आगारातील बस सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.कराड समर्थका कडून परळी शहरात ठिय्या आंदोलन केले जात असून रस्त्यावर टायर जळून देखील निषेध व्यक्त केला जात आहे.