जातीय तेढ निर्माण केल्याने पोलीस कर्मचारी निलंबित.
शिवाजीनगरच्या पोलीस कर्मचाऱ्याला एसपी चा दणका.

बीड(प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याची प्रेस नोट काढली होती.या अनुषंगाने येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी असलेले गोरख हाडुळे यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी पोलीस अधिक्षक यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोशल मीडियावर जातीय,सामाजिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्याने तत्काळ पोलीस अधीक्षकानी पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन केले. सदर कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.गोरख हाडुळे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. सोशल मीडियावर मागच्या काही काळात दोन समाजात तेढ निर्माण होईल अश्या आशयाच्या पोस्ट त्यांनी केल्या होत्या. ही बाब पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांना समजल्यानंतर त्यांनी थेट निलंबनाची कारवाई केली. कॉवत यांच्या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना हा एक चांगलाच धडा मानला जात आहे. त्यामुळे पुढील काळात देखील सामाजिक भावना, जातीय दुखावणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक सांगितले.